राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे: Solar Plant Gujarat Kade. Best News

Solar Plant Gujarat Kade.
Solar Plant Gujarat Kade.

Solar Plant Gujarat Kade.

नमस्कार मित्रांनो आपण बघणार आहोत मागील काही महिन्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रातले बरेच मोठे मोठे प्रकल्प उद्योग हे गुजरातकडे वळवण्यात आले आताही तसंच काही सोलर प्लांट हा प्रकल्प गुजरातकडे नेण्याच्या तयारी त आहे निरर्थक महायुतीत असल्याने उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे नागपूर मध्ये येणार आहे एक प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विजय वडेठीवर यांनी केला आहे

Maharashtra Politics : राज्यातील उद्योग गेल्या काही काळात गुजरातला जात असल्याचा आरोप केला जात आहे. महाराष्ट्रातील उद्योग, वित्तीय संस्था केंद्र आणि महत्त्वाची कार्यालये गुजरातला (Gujrat) पळवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातोय. आता आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प (Solar Panel Project) येणार होता. या प्रकल्पा अंतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. वेदांत-फॉक्सकॉन, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये जाणार असल्याची माहिती आहे. निरर्थक उद्योग करणारे नेते महायुतीत असल्यानं असल्यानं उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय.

Solar Plant Gujarat Kade.

मुंबई: तब्बल दीड लाख कोटींची गुंतवणूक असणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाऊन दीड महिना उलटत नाही तोच आणखी एक टाटा-एअरबसच्या रुपाने राज्याने आणखी एक प्रकल्प हातातून घालवला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत. पहिल्या दोन प्रकल्पांवेळी राजकीय वादंग निर्माण झाल्यामुळे टाटा-एअरबसचा नागपूरच्या मिहान येथील प्रस्तावित प्रकल्प महाराष्ट्राच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. हा प्रकल्प महाराष्ट्रात राहिला असता तर राज्यात तब्बल २२ हजार कोटीची आर्थिक गुंतवणूक झाली असती. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या तरुणवर्गाला मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला असता. त्यामुळे टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला जाणे, ही महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारसाठी मोठी नामुष्की ठरली आहे.

फिल्मफेअर पुरस्कारही गुजरातला?

राज्यातून वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेले. त्यानंतर हिरे उद्योगही गुजरातला गेल्यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यानंतर बॉलीवूडसुद्धा मुंबईपासून दूर नेण्याचा कट असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला होता. बॉलीवूडमधला सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर सोहळा गुजरातमध्ये करण्यात आला. यावरुन विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. आधीच महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले.. आता महाशक्तीची वक्रदृष्टी महाराष्ट्रातील चित्रपट व्यवसायावर पडली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला.

Solar Plant Gujarat Kade.

हिंजवडीतील आयटी कंपन्या राज्याबाहेर?

पुण्यातील आयटी हब म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीमधील अनेक कंपन्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. पुण्यातील वाहतुककोंडीची समस्या दिवसोंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. त्यामुळेच हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला आहे.

वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर्सचा 1 लाख 54 हजार हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये गेल्यानं राज्यात सप्टेबरमध्ये रण पेटलं होतं.

आता ‘टा-एअरबस’चा मोठा प्रोजेक्ट गुजरातला गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबरला वडोदरामध्ये या प्रकल्पाचा शिलान्यास करणार आहेत. भारतीय वायूदलासाठी मालवाहू विमान बवनण्याचा हा प्रकल्प 21,935 कोटी रूपयांचा आहे.

नागपूरमधील मिहान परिसरात हा प्रकल्प बनवण्यात येणार असल्याची चर्चा होती. “हा प्रकल्प नागपूर येथे होईल,” असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं होतं.

परदेशी गुंतवणुकीचं अग्रेसर डेस्टिनेशन अशी जी महाराष्ट्राची ओळख कायम राहिली आहे, मग तसं असूनही महाराष्ट्रापेक्षा गुजरातला झुकतं माप दिलं गेलं, असे आरोप शिवसेनेसह विरोधकांकडून होत आहेत.

वास्तविक गुंतवणुकीसाठी सगळ्याच राज्यांमध्ये स्पर्धा असते. पण महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या स्पर्धेला राजकीय फोडणी आहे. ती अगदी या दोन राज्यांच्या निर्मितीपासून आहे. पण आर्थिक उदारीकरणानंतर परकीय गुंतवणूक अधिक वेगानं येऊ लागली आणि तेव्हापासून पहिल्या काही राज्यांमध्ये या शेजाऱ्यांचा क्रमांक राहिला आहे.

Solar Plant Gujarat Kade.

मात्र नरेंद्र मोदींची गुजरातमधली बहुमतातली सत्ता सुरू झाली आणि त्यानंतर ही स्पर्धात्मकता अधिकच तीव्र झाली.

तेव्हापासूनच एकमेकांपेक्षा अधिक प्रकल्पांना आकृष्ट करण्यासाठी दोघांमधली चढाओढ वाढीस लागली. महाराष्ट्रात हळूहळू गुजरात आपले प्रकल्प नेते आहे अशी चर्चा सुरू झाली. अस्मितेच्या राजकारणात तो मुद्दा महत्वाचा होता.

आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्यासाठी इथले प्रकल्प गुजरातला नेले जातात, असं म्हटलं गेलं. मोदी पंतप्रधान झाल्यावर हे असे दावे वारंवार होऊ लागले. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रापेक्षा मोदींच्या गुजरातला झुकतं माप दिलं जातं असं म्हटलं जाऊ लागलं.

वेदांता-फॉक्सकॉन आणि टाटा-एअरबस ही त्याची नवी उदाहरणं. पण या अगोदरही अनेक खाजगी उद्योग आणि सरकारी संस्थांच्या गुजरातला जाण्याच्या निमित्तानं हे आरोप अनेकदा झाले आहेत. या निमित्तानं या अगोदर कधी, कोणकोणत्या प्रकल्पावरुन आणि कसे हे महाराष्ट्र-गुजरात वाद झाले आहेत हे पाहता येईल.

आंतराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC)

अनेकांना आठवत असेल की गेल्या काही वर्षांपासून याबद्दल सातत्यानं चर्चा होते आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच IFSC ची कल्पना केंद्रात कॉंग्रेसप्रणित ‘यूपीए’ सरकार असताना मांडली गेली होती. तेव्हा मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते.

सर्व प्रकारच्या वित्तीय सेवांशी संबंधित सरकारी आणि खाजगी संस्थांची कार्यालयं या एकाच केंद्रात असणार आहेत. रिझर्व्ह बँक, सेबी यासारख्या नियंत्रक संस्थांसोबतच आंतरराष्ट्रीय बँका, गुंतवणूक संस्था, विमा कंपन्या अशा सगळ्याच अर्थविषयक मोठ्या संस्था या केंद्रात असतील.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यानं आणि रिझर्व्ह बँकेसह अनेक संस्था इथे असल्यानं हे केंद्र आणि त्याचे मुख्यालय मुंबईतच होणार असं ठरलं होतं. महाराष्ट्र सरकारनं यासाठी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक भूखंड राखून ठेवला होता. महाराष्ट्रासोबत गुजरातही हे केंद्र आपल्याकडे व्हावं यासाठी आग्रही होतं.

Solar Plant Gujarat Kade.

Leave a Comment