झोप नाही तर गाढ झोप घेणं आहे गरजेचं: Night Shift Cha Tras Zhop N Jhalyamule. Best

Night Shift Cha Tras Zhop N Jhalyamule.
Night Shift Cha Tras Zhop N Jhalyamule.

Night Shift Cha Tras Zhop N Jhalyamule.

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कंपनीमध्ये नाईट शिफ्ट केल्यामुळे काय त्रास होऊ शकतो आपल्यांना सर्वांना झोप ही खूप प्रिय आहे जर आपण 24 तासांमध्ये कमीत कमी सहा ते सात तास झोप घेतली नाही तर आपल्याला वेगवेगळ्या आजारांना बळी पडावा लागतो तर आयुष्यामध्ये सगळ्यांना सहा ते सात तास झोप घेणार खूप आवश्यक आहे.

नाहीतर आपलं हे मौल्यवान शरीराला वेगवेगळे प्रकारच्या आजारांना सामोरे जावं लागेल जे लोक नाईट शिफ्ट मध्ये काम करतात अशांना योग्य वेळी झोपेने शक्य होत नाही अशावेळी ते सकाळी झोपतात अशा लोकांना आर इ एम झोपेचा इतरांप्रमाणे प्रभावीपणे अनुभव घेता येऊ शकतो का

What is the REM sleep?चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. चांगल्या झोपेसाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात थकवा असला तरी झोप येत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. फोनच्या व्यसनामुळे आणि सोशल मीडिया आणि टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळे आजकाल बहुतेक लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्यामुळे त्यांना चांगली झोप लागत नाही आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. चांगली झोप प्रत्येकासाठी आवश्यक आहे, परंतु काही वेळा अतिरिक्त कामांमुळे किंवा जे लोक नाईट शिफ्टमध्ये काम करतात, अशांना योग्य वेळी झोप घेणे शक्य होत नाही; अशावेळी ते सकाळी झोपतात. अशा लोकांना “आरईएम” झोपेचा इतरांप्रमाणे प्रभावीपणे अनुभव घेता येऊ शकतो का? तसेच नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांनी झोप पूर्ण करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, जाणून घेऊयात.

Night Shift Cha Tras Zhop N Jhalyamule.

REM ही झोपेची अवस्था आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती गाढ झोपेत असताना स्वप्न पाहत असते. या अवस्थेत ब्रेन स्टेम मेंदूला संदेश पाठवते, जेणेकरून शरीराच्या इतर भागांनाही आराम मिळू शकेल. मात्र, सकाळी झोपणाऱ्यांना “आरईएम” झोपेचा अनुभव घेता येतो का? या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मुंबईतील सर एचएन रिलायन्स हॉस्पिटलचे डेप्युटी कन्सल्टंट – न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर इशू गोयल आणि ग्रेटर नोएडा येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार बालरोगतज्ज्ञ, डॉ. प्रशांत यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

ग्रेटर नोएडा येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार बालरोगतज्ज्ञ, डॉ. प्रशांत सांगतात, “होय, लोकांना सकाळीही आरईएम झोपेचा अनुभव येतो. मात्र, हे तुमच्या झोपेच्या कालावधी आणि गुणवत्तेवर अवलंबून आहे. REM स्लीप ही मुख्यतः झोपेच्या सुरुवातीच्या ९० मिनिटांत येते. त्यामुळे झोप नाही तर गाढ झोप घेणं आहे गरजेचं आहे, जी रात्रीच्या वेळेतच व्यवस्थित मिळते. झोपेच्या सुरुवातीच्या या टप्प्यात मेंदूची क्रिया जशी जागृत असताना होती तशीच सामान्य असते, पण शरीर निचपीत पडून असते आणि फक्त मेंदूचं काम सुरु असतं.” “REM स्लीप मेमरी एकत्रीकरणात, तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी, तुमची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्यासाठीही मदत करते.

Night Shift Cha Tras Zhop N Jhalyamule.

डॉ. इशू गोयल यांच्या मते, झोपेमध्ये सरासरी सहा-सात चक्रे असतात आणि प्रत्येक चक्रात वेगवेगळे टप्पे असतात. जसे की, नॉन रॅपिड आय मूव्हमेंट (NREM) या प्रकारांमधून आपण वन रॅपिड आय मूव्हमेंट (REM) या प्रकारामध्ये जातो. त्यानंतर गाढ झोप हा तिसरा प्रकार असतो. हा कालावधी सर्वसाधारणपणे ९० मिनिटांचा असतो.” REM स्लीपमध्ये मेंदू दिवसा मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी आणि दीर्घकालीन आणि अल्पकालीन स्मृती तयार करण्यासाठी सक्रियपणे कार्य करतो. जर एखाद्या व्यक्तीची झोप अपुरी असेल किंवा REM स्लीप मिळत नसेल तर अशा व्यक्तिंना स्मृतिभ्रंश होऊ शकतो. किंवा स्मरणशक्ती, थकवा, दिवसा झोप लागणे आणि वारंवार डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.”

जेव्हा तुम्ही रात्री झोपत नाही तेव्हा काय होते?

डॉ. प्रशांत म्हणाले की, रात्री झोपणे टाळल्याने लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. तुम्हाला स्मरणशक्तीच्या समस्या, कार्य कमी होणे, अपचन, मूड बदलणे असा त्रास होऊ शकतो. यावेळी रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होते. सकाळची झोप रात्रीच्या झोपेची भरपाई करू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीला नाईट शिफ्टमुळे रात्रीचे जागरण करावेच लागत असेल तर चांगल्या झोपेसाठी वातावरण अनुकूल आहे, याची खात्री करणे आवश्यक आहे.

डॉ. गोयल सांगतात, “झोपण्यापूर्वी कॅफीन, अल्कोहोल, धूम्रपान यांसारखे उत्तेजक पदार्थ शक्यतो टाळले पाहिजेत. रात्रीच्या शिफ्टमध्येही लोकांनी झोपेची एकूण आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अर्धा तास, एक तास डुलकी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मेंदूतील रसायनांवर परिणाम

आपल्या मेंदूमध्ये अनेक रसायनं संदेशवहनाचं काम करत असतात. त्यातील काही रसायनांची नावे आता माहिती सर्वांना माहिती झालेली आहेत.

नॉरएपिनेफ्रिन, गाबा, डोपामिन, सिरोटोनिन ही चार प्रमुख संदेशवाहक रसायनं आपल्या वर्तनावर परिणाम करत असतात.

आनंदाची भावना, सुखाची भावना, उत्साह वाटण्यासाठी, निराश करणाऱ्या भावनेविरोधात लढण्यासाठी तसेच सकाळी फ्रेश वाटावे यासाठी या रसायनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

परंतु विविध बाह्य आणि अंतर्गत जैविक कारणामुंळे ही रसायनं कमी पडू लागली की आपल्या जीवनावर मोठा दीर्घकालीन परिणाम होतो. रसायनं कमी पडल्यामुळे ताणतणावांचा सामना करण्यातही अडथळे येतात. अनेक लोकांना रात्री झोप येत नाही किंवा चांगली सुखासीन झोप येत नाही. घाबरून किंवा चिंतेमुळे वारंवार जाग येऊ लागते. मग या अपुऱ्या झोपेचा त्यांच्या पुढच्या दिवसावर परिणाम होतो.

Night Shift Cha Tras Zhop N Jhalyamule.

या अपुऱ्या झोपेमुळे दिवसाची सुरुवातच अनिच्छेसारख्या अवस्थेत तयार होते. उठून रोजची कामं सुरू करावीत असं वाटत नाही, अंग, खांदे जड झाल्यासारखं वाटतं. कंटाळा आणि उदास असल्यासारखं वाटू लागेल.

यासर्व अवस्थेचा आपल्या कामावर परिणाम होतो. एकाग्र होऊन काम करणं अशक्य होतं. कामामध्ये रस वाटत नाही, सतत पेंगुळल्यासारखं वाटतं तर डोकंही जड झाल्यासारखं वाटतं.

अपुऱ्या झोपेचा मानसिक आरोग्यावर कशाप्रकारे परिणाम होतो हे सांगताना पनवेलस्थित मनोविकारतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर आपल्या ‘चिंता स्वरुप आणि उपाय’ पुस्तकात लिहितात, झोप न झाल्यामुळे तसेच सेराटोनिन, डोपामिन, नॉरएपिनेफ्रिन सारखी रसायनं कमी पडल्यामुळे ‘ जड डोके, आकसून गेलेले अंग व मरगळलेले मन अशी अवस्था होईल. मनात विचारांची संख्या वाढेल, त्या विचारांमध्ये नकारार्थी विचार वाढतील. विचारांची गर्दी वाढल्याने मानसिक थकवा जाणवेल. विसरल्यासारखे होईल. प्रत्येक कामात ते बिघडेल की काय अशीच शंका येत राहील. मनाला जर काही विचार टोचले की तेच विचार परत परत येत राहातील. शरीरात एखादी वेदना, दुःख असेल तर त्याची तीव्रता आहे त्यापेक्षा वाढलेली वाटेल. जुनी दुःखे, कटू आठवणी मनात परत परत रुंजी घालतील.’

अपुऱ्या झोपेच्या मोजक्या रात्रीसुद्धा मेंदूवर, मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात.

थोडे दिवस उशीरा झोपलं तर काय होणारे, नंतर झोप भरून काढू, रविवारी झोपून राहू, तरुणपणात कमी झोप पुरेशी आहे असे काही गैरसमज आपल्यामध्ये दिसून येतात. पण या कल्पनांप्रमाणे आपलं शरीर काम करत नसतं.

झोपेमध्ये थोडा जरी तुटवडा आला तर त्याचे परिणाम मेंदू आणि मानसिक आरोग्यावर होत असतात. आपल्याला रोज जेवायला, प्यायला पाणी लागतं तशी झोपही रोजच घ्यावी लागते.

इंग्लंडमधील ट्र्स्ट मी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने यासाठी एक प्रयोग करुन पाहिला. मानसिक आरोग्यावर अपुऱ्या झोपेचा परिणाम शोधण्यासाठी हा प्रयोग चार लोकांवर करण्यात आला. यासाठी शांत व पुरेशी झोप घेणाऱ्या लोकांना निवडण्यात आलं.

या लोकांच्या झोपेची गुणवत्ता आणि झोपेच्या प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी एक उपकरणही त्यांना लावण्यात आले होते. त्यांना दररोजच्या अनुभवावंर आधारीत एक प्रश्नावली देण्यात आली, त्यात ते प्रयोगादरम्यानचे अनुव लिहित होते आणि एक व्हीडिओ डायरीसुद्धा त्यांना तयार करण्यास सांगितले होते.

Night Shift Cha Tras Zhop N Jhalyamule.

Leave a Comment