दोन वर्षे गुंतवणूक आणि बनाल लखपती: Mahila Sanman Savings Yojana.

 Mahila Sanman Savings Yojana
Mahila Sanman Savings Yojana

Table of Contents

दोन वर्षे गुंतवणूक आणि बनाल लखपती:

हॅलो मित्रांनो पोस्ट ऑफिस मे आजचा महिलांसाठी खूप चांगली योजना आणली ही योजना विशेषतः महिलांसाठी डिझाईन केली असून त्यांचा आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे आजचा आर्थिक जगात गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत बँक आणि इतर संस्था गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदर देव करत असताना मात्र या सर्व पर्यायांमध्ये पोस्ट ऑफिस योजना एक वेगळी जागा घेतात त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना खास करून महिलांसाठी बनवले आहे

Mahila Sanman Savings Yojana

केंद्र सरकारने देशातील महिलावर्गासाठी एक गुंतवणुकीची योजना आणली असून या योजनेची घोषणा फेब्रुवारी महिन्यात मांडलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या योजनेचं नावं ‘महिला सन्मान बचत पत्र’ असं आहे. केवळ २ महिन्यांच्या कालावधीतच या योजनेत तब्ब्ल पाच लाख महिलांनी गुंतवणूक केली आहे. वित्त मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. तसेच या अधिकाऱ्याने इकॉनॉमिक्स टाइम्सशी बोलताना सांगितले की, महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत आतपर्यंत ३,६६६ कोटी रुपये जमा झाले आहेत. या योजनेला महिलांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले.

दोन वर्षे गुंतवणूक आणि बनाल लखपती

महिलांसाठी पोस्ट ऑफिस विशेष योजना राबवत आहे. या योजनेमुळे महिला दोन वर्षांत श्रीमंत होऊ शकतात. विशेष म्हणजे ही योजना फक्त महिलांसाठी आहे. महिलांना सरकारच्या योजनांद्वारे गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. पोस्ट  ऑफिसच्या या खास योजनेबद्दल जाणून घेऊया.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केल्याने महिलांना कोणत्याही प्रकारच्या बाजारातील जोखमीचा सामना करावा लागणार नाही. यामध्ये तुम्हाला हमखास परतावा मिळेल. या योजनेअंतर्गत महिला 2 वर्षांसाठी जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करू शकतात. दोन वर्षांत गुंतवणुकीवर 7.5 टक्के निश्चित व्याज मिळेल.
कर सूट मिळेल
सरकारी योजनांच्या माध्यमातून महिला बचत करून स्वावलंबी होऊ शकतील. या योजनेत जमा होणाऱ्या पैशांवरही सरकार करमाफी देत आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास सर्व महिलांना कर सवलत मिळेल. पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलीही त्यांचे खाते उघडू शकतात.

31,125 रुपये व्याज

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत दोन वर्षांच्या कालावधीसाठी 7.5 टक्के दराने व्याज दिले जाईल. तुम्ही 2 लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला पहिल्या वर्षी 15,000 रुपये आणि दुसऱ्या वर्षी 16,125 रुपये परतावा मिळतील. म्हणजेच तुम्हाला दोन वर्षांत 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर योजनेअंतर्गत 31,125 रुपये व्याज मिळेल.

Mahila Samman Savings Certificate :
देशातील महिलांना आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारकडून सातत्याने वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. अशीच एक योजना गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सादर करण्यात आली होती. महिला बचत सन्मान योजना असं या योजनेचं नाव असून ती पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme For Women)  माध्यमातून राबवण्यात येते. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर अगदी कमी कालावधीमध्ये मोठा परतावा मिळतो.व्यतिरिक्त इतर सार्वजनिक बँकांच्या माध्यमातूनही ही गुंतवणूक करता येऊ शकते.
काय आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना? 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही एक अल्प बचत योजना आहे. त्यामध्ये महिला 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत जमा केलेल्या रकमेवर 7.50 टक्के व्याजदर चक्रवाढ आधारावर उपलब्ध आहे.

मुदतपूर्व पैसे काढू शकता

या योजनेचा परिपक्वता कालावधी दोन वर्षांचा आहे. तुम्ही मार्च 2024 मध्ये पैसे गुंतवल्यास, खात्याची मॅच्युरिटी मार्च 2026 मध्ये होईल. परंतु अनेक वेळा पैसे गुंतवल्यानंतर, गरज पडल्याने लोकांना कालावधी पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद करावे लागते. अशा परिस्थितीत या योजनेअंतर्गत तुम्हाला मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा मिळते. एका वर्षानंतरही तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता.

MSSC खात्याचे मुदतपूर्व पैसे काढण्याचे नियम काय आहेत?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत, खाते उघडल्यानंतर एका वर्षानंतर तुम्हाला जमा केलेल्या रकमेच्या 40 टक्के रक्कम काढण्याची सुविधा मिळते. याशिवाय जर कोणत्याही खातेदाराचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत नॉमिनी पैसे क्लेम करून जमा केलेली रक्कम काढू शकतो. तसेच खातेदार कोणत्याही मोठ्या आजाराच्या वेळी खात्यातून मुदतपूर्व पैसे काढू शकतो. तुम्ही कोणत्याही कारणास्तव मुदतीपूर्वी खाते बंद केल्यास तुम्हाला 7.50 टक्क्यांऐवजी 5.50 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल

या योजनेसाठी खाते कसे उघडायचे?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत कोणत्याही वयोगटातील महिला हे खाते उघडू शकतात. सरकारने यासाठी कोणतेही वय निश्चित केलेले नाही. अल्पवयीन मुलीचे खाते पालकांच्या देखरेखीखाली उघडले जाते. पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त तुम्ही हे खाते कोणत्याही बँकेत उघडू शकता. खाते उघडताना तुम्हाला एक फॉर्म सबमिट करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यानंतर तुम्ही या खात्यात दोन लाख रुपये जमा करू शकता.

या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील?
महिला आणि तरुणींना या योजनेसाठी आधार कार्ड झेरॉक्स आणि दोन पासपोर्ट साईझ फोटोंची आवश्यकता लागेल. तसेच खात्यावर ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्या महिलांना पॅन कार्ड अनिवार्य असेल. महिला सन्मान बचत योजनेअंतर्गत एकदा खाते उघडल्यानंतर पुन्हा तीन महिन्यापर्यंत दुसरे बचत खाते उघडता येणार नाही.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना यशस्वी झाल्यानंतर ही योजनादेखील यशस्वी होईल अशी सरकारला आशा आहे . ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत डिपॉजिट मर्यादा तीस लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. यामुळे मे महिन्यात या योजनेअंतर्गत १३,००० कोटी जमा झाले आहेत.

Leave a Comment