
Delhi Mumbai Expressway.
हॅलो मित्रांनो दिल्ली मुंबई एक्सप्रेस से जगातील सगळ्यात मोठा महामार्ग म्हणून ओळखले जाईल याची लांबी 1386 किलोमीटर एवढी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली मुंबई महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले हा मार्ग देशातील सर्वात लांब म्हणून ओळखले जाईल .देशातील सगळ्यात मोठा महामार्ग आठ राज्यातून जात आहे
या महामार्गातून जात असताना वन्यजीव प्राण्यांसाठी पण वेगळी अशी व्यवस्था केलेली आहेया एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थितानां संबोधित केले. “गेल्या 9 वर्षांपासून आम्ही पायाभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक करत आहोत.
Delhi Mumbai Expressway.
आज दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचा पहिला टप्पा देशाला समर्पित करताना मला खूप अभिमान वाटत आहे. हा देशातील सर्वात मोठा आणि आधुनिक द्रुतगती मार्गांपैकी एक आहे. हे विकसित भारताचे आणखी एक भव्य चित्र आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी दहा लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम 2014 मध्ये तरतूद केलेल्या रकमेच्या पाचपट आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
जगातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आधुनिक रस्ते, आधुनिक रेल्वे स्थानके, रेल्वे ट्रॅक, मेट्रो आणि विमानतळ बांधले जात आहेत. त्यामुले देशाच्या प्रगतीला गती मिळत आहे. पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक आणखी गुंतवणूक मिळण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळेच केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर सातत्याने मोठी गुंतवणूक करत आहे.
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा दिल्ली-दौसा-लालसोट टप्पा 246 किमी लांबीचा आहे. 12,150 कोटी रुपये खर्च करून तो विकसित करण्यात आला आहे. हा टप्पा सुरू झाल्याने दिल्ली ते जयपूर प्रवासाचा वेळ पाच तासांवरून साडेतीन तासांवर येणार आहे. तर दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे असेल, ज्याची एकूण लांबी 1,386 किमी आहे.
Delhi Mumbai Expressway :सहा राज्यांमधून जाणार एक्सप्रेसवे
या महामार्गामुळे दिल्ली ते मुंबई प्रवासाचा वेळ वाचणार आहे. पूर्वी या प्रवासाला 24 तास लागायचे, आता हा प्रवास 12 तासात पूर्ण होणार आहे. हा एक्सप्रेसवे (दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे) दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून जाणार आहे.
देशाच्या विकासात रस्त्यांची जोडणी महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे औद्योगिक, पर्यटन, कृषी, व्यापार, व्यावसायिक क्रियाकलापांना चालना मिळते. सध्या भारतात अनेक एक्सप्रेसवे अस्तित्वात आहेत. याशिवाय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) काही नवीन द्रुतगती मार्गांच्या निर्मितीमध्ये सक्रियपणे व्यस्त आहे. या एक्स्प्रेसचेही लवकरच उद्घाटन होणार आहे. आता मुंबई आणि दिल्लीला (Delhi-Mumbai Expressway) 12 तासांत जोडणारा 1,386 किमी पसरलेला आणि नऊ टप्प्यांत विभागलेला महामार्ग प्रकल्प जवळपास पूर्ण झाला आहे. या वर्षाच्या अखेरीस याचे आठ टप्पे कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.
Delhi Mumbai Expressway.
अशाप्रकारे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी डिसेंबरपासून या राज्यांतील अनेक शहरांसाठी वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे आठ टप्पे लवकरच वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. यातील दोन टप्पे यापूर्वीच सुरू झाले असून वाहतूक सुरू आहे.
Delhi Mumbai Expressway.
सध्या कार्यरत असलेल्या विभागांमध्ये दिल्ली ते दौसा सवाई माधोपूर हा 293 किमीचा विभाग आणि 245 किमीचा झालावाड-रतलाम या मध्य प्रदेश/गुजरात सीमा विभागाचा समावेश आहे. भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण (NHAI) नुसार, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर 80 टक्क्यांहून अधिक काम झाले आहे, जो देशातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग आहे. उर्वरित कामही निर्धारित वेळेत पूर्ण केले जाईल. हरियाणा ते मुंबईला जोडणारा अंतिम टप्पा या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासह दिल्ली ते वडोदरा (845 किमी) या एक्स्प्रेस वेचे 96 टक्के काम पूर्ण झाले आहे.
Delhi Mumbai Expressway.
सापूर ते जवाहरलाल नेहरू बंदर (95 किमी), सुरत ते विरार (291 किमी), भरूच ते सुरत (38 किमी), मध्य प्रदेश सीमा ते गुजरात (148 किमी), आणि सवाई माधोपूर ते झालावाड (159 किमी). याव्यतिरिक्त, वडोदरा ते भरूच (87 किमी) पूर्ण झाला आहे परंतु सार्वजनिक उद्घाटनाची प्रतीक्षा आहे.
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग सोहना, हरियाणा येथून सुरू होतो. या महामार्गाचा विशेषत: दिल्ली, गुडगाव, फरिदाबाद, जयपूर, अजमेर, किशनगड, कोटा, उदयपूर, चित्तोडगड, सवाई माधोपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, सुरत आणि त्यांच्या आसपासच्या भागांसह प्रमुख शहरांतील प्रवाशांना फायदा होणार आहे.
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे: मार्ग
हा महामार्ग 1386 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. दिल्ली मुंबई महामार्ग दिल्ली हरियाणा राजस्थान मध्यप्रदेश गुजरात महाराष्ट्र या देशातील अग्रगण्य राज्यांना जोडणारा एक प्रमुख दुवा राहणार आहे. यामुळे यावर नमूद केलेल्या राज्यांना डायरेक्ट बेनिफिट होणार असून अप्रत्यक्षपणे देशातील इतरही राज्यांना यामुळे कनेक्टिव्हिटी प्रदान होणार आहे.
परिणामी देशाच्या एकात्मिक विकासाला यामुळे चालना मिळणार असा दावा जाणकारही करत आहेत. वास्तविक हा महामार्ग सहा राज्यातून जातो यात काही नवल नाही तर यामुळे देशातील अग्रगण्य आणि औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना जोडण्याचा मानस शासनाने आखला आहे.
यामुळे देशातील व्यापारी दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, पर्यटन दृष्ट्या कृषीदृष्ट्या महत्त्वाच्या अशा कोटा इंदूर जयपूर वडोदरा सुरत यांसारख्या शहरांशी राजधानी मुंबईचा थेट कनेक्ट वाढणार आहे. हा महामार्ग सध्या आठ लेनचा असून भविष्यात 12 लेनपर्यंत याला विस्तारित करता येणे शक्य होणार आहे. या मार्गावर एकूण 40 इंटरचेंज राहणार आहेत.
ह्या एक्सप्रेस वे वर प्रवेश बंद आहे, म्हणजे महामार्गाच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला कोणीही ये-जा करू शकणार नाही. एक्स्प्रेस वे चे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ३२ कोटी लिटर इंधनाच्या वापरात घट होणार आहे. यासह, कार्बन डायऑक्साइड (CO2) उत्सर्जनात ८५ कोटी किलोग्रॅमची घट होईल, जे ४० दशलक्ष झाडे लावण्याइतके आहे. पर्यावरणासाठी ते खूप फायदेशीर ठरेल. महामार्गावर दर ५०० मीटरवर पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था असेल. तसेच द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला ४० लाख झाडे लावण्याचे नियोजन आहे.
वन्यजीवांची विशेष काळजी
आशिया खंडातील हा पहिलाच महामार्ग आहे, ज्याच्या बांधकामात वन्यजीवांसाठी ग्रीन ओव्हरपास उपलब्ध करून दिला जाईल. त्याअंतर्गत आठ लेनचे दोन बोगदे बांधण्यात येणार आहेत. यापैकी एक बोगदा प्रथम राजस्थानमधील मुकुंद्रा अभयारण्यातून बांधला जात आहे तर दुसरा बोगदा महाराष्ट्रातील माथेरान इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये बांधण्यात येणार आहे. त्याची लांबीही चार किलोमीटर आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, हा द्रुतगती मार्ग मुकंद्रा आणि रणथंबोरमधूनही जात आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून सायलेंट कॉरिडॉर आणण्यात येत आहे.
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे: मार्ग
जगातील दुसऱ्या क्रमांकाचे ग्रीन ओव्हरपास जंगल असलेल्या बुंदी-सवाईमाधोपूर दरम्यान वन्यजीवांच्या संरक्षणासाठी साडेतीन किलोमीटरच्या अंतराने ५ ग्रीन ओव्हरपास तयार करण्यात येत आहेत. हा ओव्हरपास रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, बुंदी रामगढ व्याघ्र प्रकल्प आणि कोटा मुकंद्र हिल्स व्याघ्र प्रकल्पादरम्यानच्या कॉरिडॉरवर बांधला जात आहे. या तिन्ही राष्ट्रीय उद्यानांमध्ये वन्यजीव सहज ये-जा करू शकतात. यासोबतच मुकंद्र हिल्स व्याघ्र प्रकल्पात चार किलोमीटर अंतरावर बोगदे बांधले जात आहेत.
१२ लेनचा हायवे
सध्या हा द्रुतगती मार्ग आठ लेनचा आहे. मात्र येत्या काही दिवसांत तो १२ लेनपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या महामार्गाच्या मध्यभागी २१ मीटर रुंद जागा सोडण्यात येत आहे. वाहतूक वाढल्याने दोन्ही बाजूला आणखी दोन लेन करण्यात येणार आहेत. गडकरी म्हणले की, देशात असा एक महामार्ग असावा जो इलेक्ट्रिक असेल. त्यामुळे रेल्वेसोबतच बस आणि ट्रक ही इलेक्ट्रिक मार्गाने धावू शकतील यासाठी या महामार्गाला इलेक्ट्रिक हायवे करण्यात येणार आहे. एवढा लांबलचक १२ लेनचा महामार्ग जगात कुठेही नसल्याचा गडकरींचा दावा आहे.