हार्ट अटॅक येऊ शकतो जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात: Influenza flu & Heart attack. BestNews.

Influenza flu & Heart attack.
Influenza flu & Heart attack.

Influenza flu & Heart attack.

नमस्कार मित्रानो आपण बागणार आहोत इन्फ्ल्यूंझा बद्दल जाणून घेणार आहोत सध्याच्या धावत्या युगामध्ये आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतो सतत माणूस काही ना काही कामांमध्ये अडखळलेला असतो त्यामुळे स्वतःच्या मौल्यवान शरीराकडे दुर्लक्ष होत असतं पण या आजाराकडे दुर्लक्ष नाही झाले पाहिजे आपण पुढे जाणून.
इन्फ्लुएंझा हा विशिष्ट हंगामात बळवणारा संसर्गजन्य आजारा असून पावसाळा नि हिवाळ्यामध्ये जास्त दिसून येतो विषाणूचे एबीसी असे तीन प्रकार आहेत तीन ज्याच्या या प्रकारामध्ये स्वयंपल्सचा समावेश आहे

स्वयंप्यू व्यंजन विषाणूमुळे मुलांमध्ये खोकला आणि तापाशी समस्या सध्या मोठ्या प्रमाणात मिळते मात्र याला घाबरण्याचे गरज नाही यावर लवकर नेत्यांना आणि उपचार केले आहे मुले लवकरात लवकर बरे होऊ शकतात निधन झालेल्या बहुतांश मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत नाही मात्र यावर वयश लक्षणं दिल्यास त्याला निमोनिया होण्याचा धोका असतो

Influenza flu & Heart attack : 

तरुणांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेकांना हृदयविकाराचा झटका आल्याचे अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षांमध्ये समोर आली आहेत. अयोग्य जीवनशैली, पोषक आहार न घेणे, सतत तणाव व हृदयाशी संबंधित समस्यांमुळे हृदयविकाराचा झटका येतो, हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल पण व्हायरल फ्लूनमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त वाढतो, असे तुम्ही कधी ऐकले आहे का?
न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल फ्लूमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, असे त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहेत.

Influenza flu & Heart attack.

डॉ. सुधीर कुमार या व्हिडीओमध्ये सांगतात, “फ्लू झाल्यानंतर हृदयविकाराचा धोका वाढतो. अलीकडे यावर अभ्यास करण्यात आला. त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार, फ्लू झाल्यानंतर १ ते ७ दिवसामध्ये हृदयविकाराचा झटका सहा पटीने वाढतो.”

बंगळुरू येथील जनरल मेडिसिन फिजिशियन डॉ.पल्लेती सिवा कार्तिक रेड्डी (Dr Palleti Siva Karthik Reddy) दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “मी प्रत्यक्ष पाहिलं आहे की व्हायरल फ्लू, वेदना आणि ताप यांच्या पलीकडे कसा वाढतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की साधारण श्वसन संसर्गामुळे हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो.”

डॉ. रेड्डी पुढे सांगतात, “ व्हायरल फ्लू(इन्फ्लूएंझा) तुमच्या शरीरात एक दाहक प्रतिक्रिया (inflammatory response) निर्माण करते. या प्रतिक्रियेमुळे तुमच्या धमन्यांमध्ये सूज येऊ शकते ज्यामुळे धमन्यांमध्ये असलेल्या प्लेक अस्थिर होऊ शकतात आणि तुटू शकतात ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो”

Influenza flu & Heart attack.

या फ्लूमुळे तुमच्या शरीरातील रक्त सुद्धा गोठू शकते, ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. या रक्ताच्या गुठळ्या हृदयात रक्त प्रवाह रोखत असेल तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

फ्लूमुळे येणारा ताप, हृदयाचे ठोक्यांमध्ये अनियमितपणा आणि फ्लू दरम्यान तुमच्या शरीरावर येणारा एकूण ताण यामुळे तुमच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो. आधीच खूप जास्त कामाचा स्ट्रेस असलेल्या लोकांना किंवा हृदयविकारासंबंधित आजार असलेल्या लोकांना हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.

डॉ. रेड्डी सांगतात, “काही प्रकरणांमध्ये, फ्लू थेट हृदयाच्या स्नायूंवर परिणाम करू शकतो, ज्यामुळे छातीत जळजळ निर्माण होऊ शकते आणि हृदयाचे कार्य बिघडू शकते.”

Influenza flu & Heart attack.

फ्लूनंतर कोणालाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, पण डॉ रेड्डी यांच्या मते, काही लोकांना याचा जास्त धोका असतो.

आपले जसे वय वाढते तशी आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे वयोवृद्ध लोकांना फ्लू लवकर होतो आणि वयानुसार त्यांच्या हृदयाच्या समस्या सुद्धा वाढतात

ज्या लोकांना आधीपासूनच हृदयाशी संबंधित समस्या आहेत. उच्च रक्तदाब किंवा इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधित आजारांचा धोका आहे, त्यांना फ्लूनंतर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.

ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे, कर्करोगाचा उपचार घेत असलेल्या किंवा एचआयव्ही/एड्स सारखे आजार असलेल्या लोकांना फ्लूसह हृदयाशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो.

हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी खालील उपाय करू शकता.

लसीकरण करा – फ्लूपासून वाचण्यासाठी लसीकरण हा उत्तम पर्याय आहे.

स्वच्छता राखा – आपले हात वारंवार धुवा, आजारी व्यक्तींबरोबरचा संपर्क टाळा आणि खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक नीट झाका.

वैद्यकीय उपचार घ्या – जर तुम्हाला फ्लू झाला असेल तर लगेच तुमच्या डॉक्टरांना भेटा. औषधांसह लवकर उपचार केल्याने तुम्ही आजारातून लवकर बरे व्हाल ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

वारंवार हृदयाची आरोग्य तपासणी करा – जर तुम्हाला आधीपासून हृदयाच्या समस्या असेल तर आरोग्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. वेळेवर औषधे घेणे, निरोगी जीवनशैली स्वीकारणे, कार्डिओलॉजिस्टकडे नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.

जीवनशैली सुधारा – जर तुम्हाला फ्लू झाला असेल तर भरपूर विश्रांती घ्या, भरपूर पाणी प्या आणि तुमच्या हृदयावर ताण पडेल अशा कठीण गोष्टी करणे टाळा.

मुलांना लक्षणे असल्यास पालकांनी काय करावे ?
खोकला, सर्दी आणि जास्त ताप येत असेल आणि तो कमी होत नसेल तर घरच्या घरी औषधे घेऊन उपचार करून नका. लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना भेटा, जेणेकरून त्यावर लवकर उपचार सुरू करता येतील.हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की प्रत्येक इन्फ्लूएंझा हा स्वाइन फ्लू नसतो.सामान्य इन्फ्लूएंझा देखील असतो. सामान्य इन्फ्लूएंझा हा फ्ल्यू सारखाच असतो
इन्फ्लूएन्झा झाल्यावर काय करावे?
तुमचे मूल आजारी असल्यास, त्याला शाळेत पाठवू नका,कारण त्यामुळे इतरांना संसर्ग होऊ शकतो. तापाची लक्षणे वाढत असल्याचे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.जर मुल 5 वर्षांपेक्षा मोठे असेल तर त्याला मास्क लावण्यास सांगा.नियमितपणे हात धुणे गरजेचे आहे.मुलांचा आहार सकस असल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.इन्फ्लूएन्झा हा कोविड सारखा श्वसनाचा विषाणू आहे मात्र तितका गंभीर नाही. काही मुलांमध्ये सर्दी-खोकला ताप गेल्यानंतरही बरेच दिवस राहताना दिसत आहे.औषधोपचार सुरू असल्यास सर्दी-खोकला आपोआप कमी होत जातो.म्हणूनच वेळेवर उपचार घ्यावे.
Influenza flu & Heart attack.

 

Leave a Comment